बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

मराठा साम्राज्याची घसरण

मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणुन ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहिही मिळाले नाही. इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणुन मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसर्‍या आंग्ल-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओरिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसर्‍या आंग्ल-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणुन सामिल झाले.

पेशव्यांचे मराठी सैन्यदल

मराठी सेनादल

मराठी सेनादल हे अनेक धर्मांच्या आणि अनेक देशांच्या सेनांचे मिळून बनलेले असते. त्यामुळे त्याच्यात एकसंधीपणाच नाही असे कोणाला वाटल्यास नवल नाही. त्यांना एक ठराविक असा गणवेश दिलेला नसतो आणि त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून त्यांच्यात फारशी शिस्त नसावी असेच बघणार्‍याला वाटते. चिलखतधारी सैनिक खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. त्यांच्या डोक्यावरचा जिरेटोप कानावरून असतो व जवळ जवळ खांद्यापर्यंत येतो. अंगरखा कापसाच्या जाड रजईसारखा बनवलेला असतो व याच्यावर लोखंडी साखळ्यांची जाळी बसवलेली असते.

सेनादलातील तुकड्या

हिंदुस्तानातील ज्या जातिजमातींचे लोक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, असे सर्व हिंदू व मुसलमान लोक, सैन्यात पराक्रम गाजविण्यासाठी मोठे उत्सुक असतात. पेशवे स्वत: ब्राम्हण असले तरी त्यांनी सैनिकी पेशा पूर्णपणे अंगिकारलेला आहे. त्यांचेच अनुकरण करून अनेक ब्राम्हण कुटुंबांनी अगदी साध्या सैनिकाच्या हुद्यापासून हा पेशा स्वीकारलेला दिसतो. सैनिक किंवा सरदार यांना समाजात जो मान मिळतो तो राजकारण किंवा इतर कोणत्याही पेशातल्या व्यक्तीला मिळत नाही.
देशातील सर्वसाधारण हिंदू किंवा मुसलमान सैनिकापेक्षा उत्तरेकडून आलेले व्यावसायिक सैनिक जास्त कडवे वाटतात. या उत्तरेकडून आलेल्या सैनिकात, समरकंदकडून आलेले मुघल, इराणच्या व कंदहारच्या बाजूने आलेले पठाण व कास्पियन समुद्राजवळचे तुर्की या सर्वांचा समावेश होतो. यातले खूपसे सैनिक स्वत:चे हत्यार व घोडा घेऊन सैन्यात येतात. व युद्ध करण्याशिवाय त्यांना इतर काही रस नसतो. यातले काही पायी चालणारे सैनिक स्वत:ची बंदुक घेऊनही येतात यांना नजीब म्हणून ओळखले जाते. या सैनिकांनी युरोपियन सैन्यांची शिस्त अंगिकारली असल्याने त्यांना सैन्यात लगेच नोकरी मिळू शकते.
या शिवाय पेशव्यांच्या सैन्यात, रजपूत सैनिकांच्या स्वत:चा ध्वज असलेल्या तुकड्या असतात. रजपूत लढवय्यांच्यात, इतर सैनिकात अभावानेच दिसणारे, शौर्य, उदारपणा व खाल्या मिठाला जागण्याची वृत्ती हे गुण भरपूर असल्याने ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत. हे सैनिक अजमेरच्या आजूबाजूच्या प्रदेशातून येतात व स्वातंत्र्याची महति यांच्याइतके दुसरे कोणीही जाणत नसतील. पूर्वेकडून आलेले पुरभय्ये सैनिकांच्याही स्वत;च्या तुकड्या असतात. हे सर्व व्यावसायिक सैनिक असल्याने यांच्यात नियमितपणा आणि त्यांना नोकरी देणार्‍या पेशव्यांच्याबद्दल संपूर्ण निष्ठा हे गुण आढळतात.
या लढवय्या सैनिकांखेरीज, मराठा सैन्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे पेंढारी आणि बाजारबुणगे. या लोकांच्या हातात ठराविक हत्यार असे नसते. एकदा मुख्य सैन्याने एखादा प्रदेश काबीज केला की त्या प्रदेशात लूटमार करणे हे या लोकांचे काम असते. घराच्या कड्या, कुलपे, बिजागर्‍यांपासून ते साठवून ठेवलेले धान्य यापर्यंत सर्व गोष्टींची हे लूट करतात. त्यांना पगार मिळत नाही पण मिळालेल्या लूटीत वाटा मिळतो.
सैन्य व अधिकारी वर्गाच्या सामानाची हलवाहलव करण्यासाठी उंटदलाचा वापर केला जातो. या साठी सैन्याच्या छावणीत एक उंटदल तयार असते.

घोडदल

मराठ्यांच्या सैन्यातले घोडदल तीन वर्गांत विभागलेले असते. पहिल्या वर्गातले घोडेस्वार सैनिक, हुजुरत किंवा खाशीपागा या नावाने ओळखले जातात. हे घोडदल पेशव्यांचे स्वत:चे असते व त्यातील सैनिक अत्यंत वरिष्ठ दर्जाचे लढवय्ये असतात. दुसर्‍या वर्गातील घोडदल हे जहागिरदारांचे व मनसबदारांचे असते तर तिसर्‍या वर्गाच्या घोडदलात मुसलमान, पुरभय्ये वगैरे व्यावसायिक लढवय्ये मोडतात. घोड्यांची निगा राखणारे साईस या दलात दिसत नाहीत व सैनिकच स्वत: घोड्यांची निगा राखतात. जेंव्हा घोड्यांना खाण्यासाठी गवत किंवा इतर गोष्टी मिळू शकत नाहीत तेंव्हा हे सैनिक गवताची जमिनीत असलेली मुळे खणून काढतात व स्वच्छ धुवून घोड्यांना खायला देतात. मराठी सैनिक घोडे आणि रत्नसंपत्ती यांनाच सर्वात जास्त मान देताना दिसतात. अतिशय उमदे असे अरबी घोडे जरी पागेत असले तरी मराठा सैनिक त्यांच्या भीमथडी तट्टांनाच युद्धासाठी प्राधान्य देतात.

अधिकार साखळी व अधिकारी वर्ग

मराठी सैन्यात कुशलता किंवा ज्येष्ठता यावर आधारित अशी अधिकार साखळी नसते. महत्वाच्या अधिकार्‍यांना मनसबदार म्हणतात. या अधिकारी किंवा सरदारांचे एका ठराविक संख्येच्या घोडेस्वार सैनिकांवर अधिपत्य असते.(उदा. पाच हजार, पाचशे). युरोपमधल्या जुन्या सरंजामशाही मधल्या सरदारांसारखी ही प्रथा आहे. या सरदारांना त्यांची वतने किंवा जहागिरी असतात, व या जहागिरीत ते स्वतंत्र्यरित्या कारभार चालवतात. जेंव्हा कधीही त्यांना पेशव्यांचा हुकूम होतो तेंव्हा आपल्या हाताखालचे इतर दुसरे सरदार व सैनिक घेऊन या जहागिरदारांना, पेशव्यांच्या सैन्यामधे सामिल व्हावे लागते. या व्यवस्थेमुळे युरोपियन सैन्यात जी अधिकार साखळी व शिस्त दिसते त्याचा काहीसा अभाव मराठी सैन्यात दिसतो. त्यामुळे कधी पहिली गोळी झाडायची किंवा कधी ताशे बडवायचे याची शिस्त लावणे हे सेनापतीसाठी मोठे कठिण काम बनते.
सेनादलातील तुकड्यांना स्वत:चे ध्वज असतात. पेशव्यांचा ध्वज हा त्रिकोणी आकाराचा व जांभळ्या रंगाचा असतो व त्यावर सोनेरी जरीचे काम केलेले असते. बहुतेक ध्वज लाल रंगाचे असतात. काही तुकड्या ते उंच उभारतात तर काही मध्यम उंचीवर असतात. अतिशय वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घोड्यांचे खोगिर व डोके यावर तिबेटहून आणलेले तिबेटी गाईंच्या केसांची झालर लावलेली असते. या सरदारांच्या एका बाजूला असलेल्या एका सेवकाने त्यांच्या डोक्यावर जरीचे काम केलेली मखमली छत्री धरलेली असते तर दुसर्‍या बाजूचा सेवक चवरी ढाळत असतो. सेनापती त्यांना मिळालेल्या एखाद्या मानसन्मानाच्या बिरुदाने ओळखले जातात.
पेशवे आणि इतर अतिशय वरिष्ठ अधिकारी युद्धाच्या आणि इतरही वेळी हत्तींचा वापर करतात. या साठी एक हत्तीदल तयार ठेवले जाते.

निर्णय घेण्याची पद्धत

युद्धक्षेत्रावर असले तरी पेशव्यांची राज्यकारभार चालविण्याची पद्धत पुण्यातून चालणार्‍या कारभारपद्धतीसारखीच असते. रोज संध्याकाळी सर्व महत्वाचे अधिकारी आणि मंत्री पेशव्यांच्या दरबारात जमतात. राजकारण, युद्धाची हालहवाल, व इतर महत्वाच्या बाबतींवर चर्चा होते व पुढच्या दिवसासाठी फर्माने सोडली जातात. तक्रारी ऐकल्या जातात, अन्याय दूर केले जातात व न्यायही दिला जातो.
मराठ्यांच्या सैन्याची मला नवीन समजलेली एक व्युहरचना म्हणजे जेंव्हा शत्रुचे एखादे गांव काबीज करावयाचे असते त्या वेळी त्या गावाभोवती दिलेला वेढा. या व्युहामधे वेळ खूप लागत असला तरी एकदाही बंदुक न झाडता तुम्ही विजय मिळवू शकता.

शस्त्रे व हत्यारे

एका तुकडीतल्या सर्वांच्याकडे सारखीच हत्यारे कधीच नसतात. काही सैनिकांकडे ढाल तलवार असते. ठासून भरण्याच्या दारूच्या बंदुका(Musket) काही जणांकडे असतात. या शिवाय धनुष्य-बाण, भालाधारक सैनिकही दिसतात. काही जण अग्निबाण उडवण्यातले तज्ञ असतात. काही जणांजवळ परशु (Battle Axe) असतो. परंतु सर्व सैनिकांजवळ तलवार (Sabre) ही असतेच. तलवारी नेहमी धारदार व उत्तम रित्या परजलेल्या असतात. तुर्की किंवा इराणी सैनिक बहुतांशी वक्री(Curved Blade) तलवार वापरतात. घोडेस्वार मराठा सैनिकांना दुहेरी धारेची, सरळ तलवार पसंत असते. या तलवारीला ते ‘अल्मन’ (German) म्हणतात व दमास्कसवरून येणार्‍या या तलवारींसाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. त्यांची ही तलवार चालविण्याची कुशलता अतिशय उत्तम असते.
अतिशय त्रासदायक वाटणारे मराठ्यांचे अग्निबाण म्हणजे 2 इंच व्यासाची व 8 ते 10 इंच लांबीची एक लोखंडी नळी असते. ही नळी एखाद्या भाल्याला बांधली जाते. नंतर या नळीत दारू भरून ती वातीच्या सहाय्याने पेटविली जाते. हा अग्नीबाण जर योग्य दिशा देऊन सोडला तर शत्रूपक्षात मोठा गोंधळ आणि घबराट उडवून देतो. मात्र मराठ्यांना उखळी तोफेचे ज्ञान नसावे असे वाटते.

मराठे गारदी

 १७५० च्या दशकातील मराठ्यांची महत्त्वाची लष्करी कमान. यातील सैनिक तोफखाना चालवण्यात तसेच बंदूक चालवण्यात पटाईत होते. इब्राहिम खान गारदी कडे या कमानीचे नेतृत्व होते. गारदी त्याकाळचे देशी मस्केटीयर्स होते. त्यांची तुलना रोमच्या प्रेटोरियन रक्षकांशीही केली जाते.

इंग्रज-मराठा युद्ध

पहिले मराठा - इंग्रज युद्ध 

वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा - इंग्रज युद्ध म्हणुन सुद्धा ओळखले जाते. मराठे - इंग्रज यांत एकूण तीन युद्ध झाली. भारताच्या इतिहासात या ३ लढाया अतिशय महत्वाच्या आहेत. या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढाईत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन क‍रुन इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले
पावसाळा संपल्या नंतर इंगजांनी मुंबई हून साधारण ४००० फोज घेत प्रयाण केले. रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येउन मिळतील. इंग्रजांचा पणवेल मार्गे , कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकर ही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथ रावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्या सारख्या होत्या. का‍र्ले, खंडाळा, या भागात इंग्रज पोहोचे पर्यंत त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत चे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिक कापुन जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून पाण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीवेळी सुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरु ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्यालाआल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढु दिला, हेतू हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा. यादरम्यान उत्तर भारतातून येणार्‍या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपुरच्या भोसलेंना तशा सुचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिलेंनाही तशाच सचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून अत्याधुनिक रसदि इंग्रजांना मिळालीच नाही. ३१ डिसेंबर ला इंग्रज फौजे ने खंडाळ्याचा मुक्काम केला. ४ जानेवारी ला त्या कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शुर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजे कडुन मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगाव सुद्धा रिकामे करुन जाळले होते, आणि पानवठे सुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठाफौजे माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगाव चा आश्रय घेतला. १३ जानेवारी ला रात्री मराठ्यांनी वडगांव वर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवे पर्यंत तो चालुच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपुर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांना १७७३ पासुन जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्च ही द्यायचे मान्य केले.

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध


दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरुन आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. दुसर्‍या बाजीरावचा होळकरांनी २५ ऑक्टोबर १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी भासीचा तह या नावाने ओळखली जाते. या तहा नुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. बाजीरावच्या या देशघातकी निर्णयाने मराठे संस्थनिकात संतापाची लाट उसळली व ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरु झाले. मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली व जनरल लेक यांनी केले. ब्रिटीशांनी मुख्यत्वे दोन आघाड्या उघडल्या उत्तरेकडील आघाडीचे नेतृत्व लेक यांनी केले तर दक्षिणेकडे वेलेस्लीने आघाडी सांभाळली. इंग्रजांनी मराठ्यांना चुचकारण्यासाठी सरळसरळ संस्थानिकांच्या शहरांवर हल्ल्याची योजना बनवली. शिंद्यानिही शत्रुला लवकर संपवावे या दृष्टीने आपली सेना दक्षिणेला भोसल्यांच्या मदतीला पाठवली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आष्टी, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदर्‍याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली. यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला. 


तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 

मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध (इ.स: १८१७- १८१८). या युद्धात इंग्रजांनी मराठी साम्राज्याचा अस्त केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

.

मराठा-मोघल २७ वर्षाचे युद्ध

मराठा मोघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दिर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सूरू झालेले हे युद्ध १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर थांबले. या युद्धामध्ये विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाहींसारखी मोठी राज्ये मुघल आक्रमणापुढे संपुष्टात आली परंतु तुलनेने लहान असे मराठ्यांचे राज्य संपवण्यात पूर्णतः अपयश आले खूप मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ मुघल राज्याची संपत्ती या मोहिमेत खर्च झाली त्यामुळे नंतरच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार थांबला व काही वर्षातच मुघल साम्राज्य हे छोट्या राज्यापुरते मर्यादीत झाले. या नंतर मराठे, राजपूत जाट व शीख यांचे भारतावर वर्चस्व स्थापन झाले.

मराठेशाहीचे इतर आधारस्तंभ....


चिमाजी अप्पा

चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.

सदाशिवराव भाऊ

सदाशिवरावभाऊ (५ जुलै, १७३० - १४ जानेवारी / २० जानेवारी, १७६१) यांनी मराठ्यांचे पानिपतच्या तिसर्‍या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. अत्यंत भीषण युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. सदाशिवराव भाऊंचा या लढाईत मृत्यू पावले.चिमाजी अप्पांचे चिरंजीव सदाशिवराव भाऊ आईविना आजी राधाबाई साहेब यांच्याकडे लहानाचे मोठे झाले. अप्पा नेहेमीच बाजीराव साहेबांबरोबर मोहिमेवर असायचे लहान सदाशिवाकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नसायची. त्यानंतर ते शाहू महाराजांकडे दौलतीचे शिक्षण घेण्यसाठी दाखल झाले. जितके लेखणीमध्ये तरबेज तितकेच तलवारबाजीत. नंतर नाना साहेबांचा लग्नानंतर नाना आणि भाऊमध्ये अंतर पडू लागले याला कारण गोपिकाबाई. त्यांनी फक्त आपले आणि आपल्या मुलांचे कसे होईल याचाच विचार केला. खूप दिवस गोपिकाबाईंमुळे भाऊ शनिवार वाड्यावर येवू शकले नाही. ते सातार्‍याला होते. शेवटी शाहू राजांनी आज्ञा दिली आणि नानासाहेबांनी भाऊंना पुण्याला नेले. त्यानंतर भाऊंनी दौलतीचे कारभारी म्हणुन सूत्रे हाती घेतली. त्यांच्या काळात मोठातल्या मोठा भाऊंपुढे यायला कापायचा त्यांचा हिशोभ इतका पक्का कि ते लगेच समोरच्याला कात्रीत पकडायचे. भाऊंनी पहिल्यांदा नेतृत्व दाखवले ते निजामाविरुद्धदौलताबादचा किल्ला सर केला. निजाम जेव्हा हात बांधून आला तेव्हा भाऊंनी इब्राहीमखान गारदी यास निजामाकडून मागून आपल्या सैन्यात घेतले .

अहिल्याबाई होळकर 

अहिल्याबाई होळकर(जन्मः १७२५ ते १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते. माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्युनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे, घाट बांधली वा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर , यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हणुन ओळखतात. ही भारताच्या,माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची 'तत्वज्ञानी राणी' म्हणुन ओळखली जाते. तीच जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तीने नर्मदातीरी, इंदोर च्या दक्षिणेकडील महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे सन १७५४ मध्ये,कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यु पावले.तिने, आपल्या साम्राज्याचे तुंगांपासुन??रक्षण केले. ती लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.तिने,तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणुन नेमणुक केली.ती न्यायदानासा ठी प्रसिद्ध होती,एकदा तर तिने स्वतः च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोग्या कामांमुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडविण्याची शिक्षा केली. राणी अहिल्यादेवी हीने अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आणी महेश्वर,इंदोर ची सजावट केली. ती अनेक देवळांची आश्रयदाती होती.त्यात,तीने तिच्या राज्याबाहेरही अनेक मंदिरांचे व इतर अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यापैकी,द्वारका , गुजरात , काशी च्या पुर्वेस गंगातीरावर वाराणसी ,उज्जैन मध्य प्रदेश, नाशिक महाराष्ट्र व परळी वैद्यनाथ महाराष्ट्र याचा प्रामुख्याने समावेश आहे.सोमनाथ चे अपवित्र व ध्वस्त झालेले देउळ बघुन अहिल्यादेवींनी शिवाचे एक देउळ बांधले जे सर्व हिंदूद्वारे अजुनही पूजिल्या जाते.

तात्या टोपे

रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे (१८१४ - एप्रिल १८, १८५९) हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते. १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले. १८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती. पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती. नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव या पार्श्र्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता. तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्र्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले. ७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेर्‍यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, होता तो देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान! १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानानेही भरून आणणारी ही घटना तात्यांसारख्या मराठी वीराची ख्याती जगभर पसरवून गेली.

महादजी शिंदे

पेशवाईतील मुत्सद्दी. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे मराठा साम्राज्याचे पहिले आरमारप्रमुख होते. यांनी ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज अलिबाग येथे झाला. नाविक फौजांविरुद्ध लढा देऊन मराठा आरमाराचे नेतृत्व केले. कान्होजींचा जन्म कान्होजींना इ.स. १६९८ साली मराठा सरखेल तथा आरमारप्रमुखपदी नेमण्यात आले. यानंतर लगेचच त्यांनी भारताच्या जवळजवळ सगळ्या पश्चिम किनार्‍यावर प्रभुत्त्व मिळवले.

 

 

नारायणराव पेशव्यांची हत्या

मराठ्यांच्या इतिहासात पेशवे पद पूर्वी पासुन असले तरी ते प्रत्यक्ष राज्यकारभार करत नव्हते. त्या पदास प्रथम सत्तेच्या केंद्रस्थानी आणले ते बाळाजी विश्वनाथ भट यांनी. ते मुळचे श्रीवर्धनचे (कोकण) होते. औरंगजेबाच्या कैदेतून परत आलेल्या शाहू ला त्याने मदतीचा हात दिला, त्यामुळे छत्रपती शाहू त्याच्या मृत्युनंतर बर्‍याच जणांचा विरोध डावलत त्याचा मुलगा बाजीराव यास पेशवे पद दिले. पहिला बाजीराव हा अतिशय पराक्रमी निघाला येथुन ते पद वंशपंरपंरागत बनले.
बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा दसरा मुलगा चिमाजी अप्पा हे सदैव बाजीराव सोबत राहिले. त्यांना ही दोन मुले झाली. ते सदाशिव राव भाऊ व रघुनाथराव. बाजीराव पेशवे यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब हे पेशवे बनले. पण पुढे नानासाहेबास ३ मुले झाली. विश्वास राव , माधवराव , नारायणराव.
पानिपताच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांची मोठी हानी झाली. स्वतः सदाशिव राव भाऊ व विश्वास राव हे लढाईत मारले गेले. या धक्क्यानंतर कालांतराने नानासाहेब पेशवे दगावले. यावेळी अशी परिस्थिती होती, नानासाहेब पेशवे यांचे वरिष्ठ पुत्र विश्वास राव जिवंत नव्हते. सर्वात वरिष्ठ होते ते रघुनाथ राव होते. पण पेशवे पद वरिष्ठता न बघता वंशपरंपरा ठेवत, नानासाहेबांचे दुसरे पुत्र माधवराव यांकडे आले. माधवराव पेशव्यांचाही २७ वर्षाच्या आयुष्य जगुन विनासंतान मृत्यु झाला. यानंतरही पेशवे पद त्यांच्या भावाला नारायण रावांना दिले गेले. मुळात या काळात सर्वात कर्तबगार ठरत मराठा साम्राज्य रघुनाथरावांनीच वाढवले होते. अटकेपार जाणे ही म्हण त्यांच्या पराक्रमामुळेच पडली. (सद्ध्या अटक पाकिस्तानात आहे.) पेशवे पदापासुन दोनदा डावलले जात पोर्सवदातरुनांना पेशवेपद दिल्याने ते नाराज झाले. त्याला इतर काही मंडळींनीही खतपाणी घातले.
यामुळे काहीसे लहरी वागत माधवराव पेशवे यांच्या काळापासुनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालु होते. अखेर आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या म्रुत्युने त्यांची सत्ता लालसा वाढली. व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितव्य्न त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. याचा काहीसा संदेह जरी पेशव्यांकडील मंडळींना असला, तरी गारदी खुद्द पेशव्या विरोधात काही आगळीक करण्याची शक्यता इतकी तीव्र वाटली नाही. कारण इब्राहिम गारदीने पानिपतावर पेशव्यांकडुन लढत अतुल्य पराक्रम गाजवला होता. अखेर अब्दालीने त्याला जिवंतपकडले तरी हालहाल करत मारले. म्हणुन त्यानंतर कौतुक म्हणुन शनिवार वाड्याची सर्व सुरक्षा माधवराव पेशवयांनी गारद्यांकडेच दिली होती. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठ्तील मजकुर " नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली. गारद्यांनी चिठ्ठीनुसार नारायणराव पेशव्यांची हत्या केली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण ते तात्पुरते ठरले. त्यांच्या विरोधात बंड तर झालेच शिवाय नारायणरावांच्या हत्येनंतर जन्माला आलेल्या मुलालाच पेशवा बनवले गेले..

दुसरे बाजीराव पेशवे


दुसरा बाजीराव हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठी साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रुंशी केलेल्या नुकसानकारक समझोते. ऍन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश्या अनेक कारणांनी याल पळपुटा बाजीराव असेही म्हणतात

सवाई माधवराव पेशवे

पूर्ण नाव माधवराव नारायणराव भट (पेशवे)

पुरदर(पुने)

शनिवरवादा पुने
पूर्वाधिकारी नारायणराव पेशवे
उत्तराधिकारी दुसरा बाजीराव
वडील नारायणराब पेशवे
आई गंगाबाई
पत्नी रमाबाइ
इतर पत्नी रधाबाइ
राजघराणे पेशवे

रघुनाथराव पेशवे

पूर्ण नाव रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
जन्म डिसेंबर १६, १७२१
पूर्वाधिकारी थोरले माधवराव पेशवे
उत्तराधिकारी थोरले सवाइ माधवराव पेशवे
वडील थोरले बाजीराव पेशवे
आई काशीबाई
पत्नी आन्नदिबाई
संतती अम्रुतराव्, दुसरा बाजीरावपेशवे

नारायणराव पेशवे

पूर्ण नाव नारायणराव बाळाजी भट (पेशवे)
जन्म १७५५
मृत्यू ऑगस्ट ३०, १७७३

पुणे, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी थोरले माधवराव पेशवे
उत्तराधिकारी रघुनाथराव पेशवे
वडील नानासाहेब पेशवे
आई गोपिकाबाई
पत्नी गंगाबाई

डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खुनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली. खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुन: पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकीय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले.

थोरले माधवराव पेशवे

पूर्ण नाव माधवराव बाळाजी भट (पेशवे)
जन्म फेब्रुवारी १६, १७४५
मृत्यू नोव्हेंबर १८, १७७२

थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी नानासाहेब पेशवे
उत्तराधिकारी नारायणराव पेशवे
वडील नानासाहेब पेशवे
आई गोपिकाबाई
पत्नी रमाबाई

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (फेब्रुवारी १६, १७४५ - नोव्हेंबर १८, १७७२), हे मराठी राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते.
बाळाजी बाजीरावास विश्वासराव ,माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या युध्दांत पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळीं माधवरावाचें वय अवघें सोळा वर्षांचे असल्यामुळें त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहुं लागला.वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयी होता,तरी तो बुध्दिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सुक्ष्म रीतीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुध्दि ही त्याच्या अंगी होती.
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले: तेव्हा ही संधी मराठयांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी रघोबा प्रमुख असल्यामुळे राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात रघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला.त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाउन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांचे वैमनस्य आले,ती संधि साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरावर स्वारी केली. या प्रसंगी हैदराने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून् पाहिली; पण पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
या नंतर इ.स. १७७० मध्ये पुनः हैदरावर स्वारी केली.
इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदराने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदराने त्यास बंदीत टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा पेशव्यांस राग येऊन, त्याने निजामांशी दोस्ती करून हैदरावर स्वारी केली. तेव्हा हैदराने मुलूख उजादड करून तलाव् फोडून व विहीरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यास २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्याने हैदरशी तह केला.
पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडूण राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यांत पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
या वेळी मराठ्यांनी दुसरेहि एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स्. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाजीउद्दीन याने वजिराचे पद् बळकावून दुसरा अलमगीर यास तत्त्कावर बसविले. त्या वेळी अलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाअलम या नावाने प्रसिध्द होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करुन अलाहाबादेस ठाणे दिले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तक्तावर बसविले.
इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावला. तेव्हा त्याची सून अहिल्याबाई होळकर ही जहागिरीची व्यवस्था पाहू लागली. तिचा कारभार तिच्या प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे तिचे नाव उत्तर हिन्दुस्थानात अजून सर्वत्रांच्या तोंडी आहे.दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई.
इ.स. १७७२ मध्ये हैदरावरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडला .पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे व्रुन्दावन थेऊर येथे अद्ध्याप आहे.

बाळाजी बाजीराव पेशवे

पूर्ण नाव बाळाजी बाजीराव भट (पेशवे)
जन्म डिसेंबर १६, १७२१
पूर्वाधिकारी थोरले बाजीराव पेशवे
उत्तराधिकारी थोरले माधवराव पेशवे
वडील थोरले बाजीराव पेशवे
आई काशीबाई
पत्नी गोपिकाबाई
संतती विश्वासराव पेशवे, माधवराव पेशवे  

थोरले बाजीराव पेशवे




पूर्ण नाव बाजीराव बाळाजी (उर्फ बल्लाळ) भट (पेशवे)
पदव्या श्रीमंत
जन्म ऑगस्ट १८, १६९९
मृत्यू एप्रिल २५, १७४०

रावेरखेद
पूर्वाधिकारी बाळाजी विश्वनाथ
उत्तराधिकारी बाळाजी बाजीराव पेशवे (नानासाहेब पेशवे)
वडील बाळाजी विश्वनाथ
आई राधाबाई
पत्नी काशीबाई
इतर पत्नी मस्तानी
संतती बाळाजी बाजीराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, जनार्दन, समशेरबहादूर

थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, १६९९ - एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या. जेव्हा छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्यासमोर हतबल झाले, तेव्हा त्यांनी गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजीरावांना गुप्त पत्र लिहिले. अर्थात बाजीरावांनी तिथेही आपल्या तलवारीची किर्ती कायम ठेवली. त्याची परतफेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भूभाग बाजीरावांना नजर केला. शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी "मस्तानी" त्यांना दिली.
बाळाजीच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासून ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता, ते वर्चस्व पुन:प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के-कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. थोरल्या बाजीरावांची मुद्रा -
॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥
बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे.

पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्ला बांधून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" याने छत्रसाल बुंदेलावर आक्रमण केले. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजीरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.
या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील.
या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला.
चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण घाट आणि किनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक होते.

बाळाजी विश्वनाथ भट






पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे)
जन्म १६६०
मृत्यू  १७२०

सासवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
उत्तराधिकारी थोरले बाजीराव पेशवे
वडील विश्वनाथ परशरामपंत भट
पत्नी राधाबाइ
संतती थोरले बाजिराव, अन्नत
पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. हि देशमुखी शके १४०० पासुन शके १६०० पर्यंत अव्याहत चालु होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात तर रीयासतकार १४७८ च्या सुमारास हि देशमुखी मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडिल व आजोबा शिवछत्रपतींच्या सेवेत असावेत असेहि रीयासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजी या परंपरागत देशमुखीवर होता. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.

२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यु झाला. हि बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. इदच्या मुहुर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वत:ला बादशहा म्हणून जाहिर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहुंची सुटका केली. मात्र येसुबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहु महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिध्द केले होते, शाहुने गादिवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहुने सुरुवातीला समजुतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहुंचा नाईलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहुंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावुन घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहुंचा पक्ष बरोबर असुन त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहुंच्या बाजुएन गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहुंनी आपले वर्चस्व सिध्द केले. शाहुंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणुन नेमले आणि सेनाकर्ते असा किताबहि दिला.

अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभयांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. त्यास नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.
बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"
छ. राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.
औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु महाराजांची सुटका झाली. या वेळी बाळाजीने शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांच्या मतीला गुंग करणारी आहेत(वाक्याचे विकिकरण करा). आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे...

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

मराठा साम्राज्याचे शासक (१७१२-१८१८)

१. बाळाजी विश्वनाथ भट पेशवे  (१७१२-१७१९) 



२. बाजीराव पेशवे  (१७१९-१७४०)


. पहिले नानासाहेब  /  बाळाजी बाजीराव पेशवे (१७४०-१७६१)


. माधवराव पेशवे (१७६१-१७७२)


५. नारायणराव पेशवे (१७७२-१७७३)


६. रघुनाथराव पेशवे (१७७३-१७७४)


७. सवाई माधवराव पेशवे (१७७४-१७९५)


८.  दुसरा बाजीराव पेशवे (१७९५-१८५१)


९. दुसरे नानासाहेब /  धोंडोपंत पेशवे (१८५१-१८५७) 








 

मराठेशाहीची ओळख

पेशवे हे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान  होते. शिवाजी महाराजांनी हे पद प्रथम नियुक्त केलेले होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्य चालवण्याचे सर्व अधिकार पेशव्यांना देण्यात यावे असे आदेश दिले होते. पहिले पेशवे होण्याचा मान बाळाजी विश्वनाथ भट (१७१२-१७१९)  यांचा होता. शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले.
बाळाजी विश्वनाथ भट व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य वाढवले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांच्या अंमलाखाली प्रगत व्यापार, अर्थकारण यांचे जाळे अस्तित्वात आले. मुख्य कार्यालय पुण्यात व शाखा गुजरात, गंगेचे खोरे आणि दक्षिणेपर्यंत वाढल्या. शेतीचा देखील विस्तार झाला. त्याचबरोबर पेशव्यांनी दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांना हाताशी धरून कुलाबा व पश्चिम तटावरील इतर बंदरे उदयास आणली. या जहाजांनी मुंबईतील ब्रिटिश, गोव्यातील, वसईतील व दमण मधील पोर्तुगीज यांना काबूत ठेवले. त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या बाहेर आपल्या सरदारांना जहागिरीं देऊन त्यांच्यामार्फत आपले स्वामित्व अबाधित ठेवले. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले.
पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत राज्य वाढविले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापूरात गेली तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज ज्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.


मराठ्यांचा झेंडा