शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

मराठेशाहीची ओळख

पेशवे हे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान  होते. शिवाजी महाराजांनी हे पद प्रथम नियुक्त केलेले होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्य चालवण्याचे सर्व अधिकार पेशव्यांना देण्यात यावे असे आदेश दिले होते. पहिले पेशवे होण्याचा मान बाळाजी विश्वनाथ भट (१७१२-१७१९)  यांचा होता. शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली. पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले.
बाळाजी विश्वनाथ भट व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य वाढवले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांच्या अंमलाखाली प्रगत व्यापार, अर्थकारण यांचे जाळे अस्तित्वात आले. मुख्य कार्यालय पुण्यात व शाखा गुजरात, गंगेचे खोरे आणि दक्षिणेपर्यंत वाढल्या. शेतीचा देखील विस्तार झाला. त्याचबरोबर पेशव्यांनी दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांना हाताशी धरून कुलाबा व पश्चिम तटावरील इतर बंदरे उदयास आणली. या जहाजांनी मुंबईतील ब्रिटिश, गोव्यातील, वसईतील व दमण मधील पोर्तुगीज यांना काबूत ठेवले. त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या बाहेर आपल्या सरदारांना जहागिरीं देऊन त्यांच्यामार्फत आपले स्वामित्व अबाधित ठेवले. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले.
पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत राज्य वाढविले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापूरात गेली तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज ज्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.


मराठ्यांचा झेंडा


 

४ टिप्पण्या:

  1. कोणत्या शिवाजी महाराजांनी पेशव्यांना राज्यकारभार चालवण्याचे मुखत्यारपत्र दिले होते. पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तर नक्कीच नाही. तुम्ही हे कोठे वाचले की स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांनी कष्टाने उभारलेल्या स्वराज्याचे कुलमुखत्यारपत्र लगेच पेशव्यांना देवुन त्यांनाच राज्य चालवण्यास सांगितले? मग छत्रपती संभाजी राजे, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, शाहु छत्रपती हे शिवाजी महाराजांनंतर राज्यावर आलेले छत्रपती व महाराणी कोणत्या स्वराज्याचे प्रमुख होते.
    पेशव्यांना जे राज्यकारभार करण्याचे मुखत्यारपत्र दिले गेले असे म्हणतात ते बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाने छत्रपती शाहुकडुन जबरदस्तीने, भुलथापा देवुन, फसवुन मिळवले असेही म्हंटले जाते. तसेच अनेक नामांकित इतिहासकार असेही म्हणतात की असे कोणतेही आदेश शाहुने दिलेच नव्हते. ते मुखत्यारपत्र नानासाहेबाची चालबाजी होती. व शाहुच्या मृत्युनंतर त्याचे शिक्के नष्ट करण्यापुर्वी नानासाहेबाने ते खोटे पत्र बनवुन मराठा साम्राज्याचे प्रमुखपद मिळ्वले.

    उत्तर द्याहटवा
  2. पेशव्यांना जे राज्यकारभार करण्याचे मुखत्यारपत्र दिले गेले असे म्हणतात ते बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाने छत्रपती शाहुकडुन जबरदस्तीने, भुलथापा देवुन, फसवुन मिळवले असेही म्हंटले जाते. तसेच अनेक नामांकित इतिहासकार असेही म्हणतात की असे कोणतेही आदेश शाहुने दिलेच नव्हते. ते मुखत्यारपत्र नानासाहेबाची चालबाजी होती. व शाहुच्या मृत्युनंतर त्याचे शिक्के नष्ट करण्यापुर्वी नानासाहेबाने ते खोटे पत्र बनवुन मराठा साम्राज्याचे प्रमुखपद मिळ्वले.

    प्रत्युत्तर द्या
    आपली वरील टिका वाचून आपल्या मनातील पेश्व्यांविशायिचा द्वेष लक्षात येतो परन्तु आपणास एक गोश्त समजत नहीं टी म्हणजे पेश्वंकडे त्यांच्या नेतृत्वाखाली महादजी शिंदे व् मल्हारराव होलकर सारखे योध्हे लाधले ते तुमच्या सारखे केवल द्वेषी टीकाकार नव्हते तुमची त्यांचे वर टिका करण्याची पात्रता नहीं उगाचच द्वेष भावनेने टिका करू नए.

    उत्तर द्याहटवा
  3. पेश्व्यांचा इतिहास अभ्यासअवा त्यांत त्यानी मराठी साम्राज्याचे कारभारी म्हनुनच कार्य केले त्यामुलेच त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली महादजी शिंदे व् मल्हारराव होलकर सारखे योध्हे लाधले इतिहास बरकैयेने वाचावा नंतरच टिका करावी

    उत्तर द्याहटवा
  4. http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/08/blog-post_18.html
    http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/08/blog-post_20.html
    या links पहा

    उत्तर द्याहटवा